Wednesday, September 30, 2009

होतो मी एक अनामिक व्यर्थ भटकलेला...

23 comments



साधारण दोन वर्षांपुर्वी 'जस्ट' एक curiosity म्हणुन ’सेलफोन’ कॅमेऱ्याने सुरु झालेला हा नाद् आता चांगलाच रक्तात भिनलाय... गेल्या दोन-अडीच वर्षात एका नवीन प्रितम ने जन्म घेतलाय... साप जसे कात टाकतात ना तसंच काहीतरी झालय. आज जेव्हा मागे वळुन बघतो तेव्हा दोन वर्षांपुर्वीचा मी आणि आत्ताचा मी, नक्कीच जमीन-आसमानचा फरक जाणवतो. ह्या नादात खुप काही शिकलो, बदललो, एक प्रकारे सापा सारखाच कात टाकत गेलो आणि स्वत:लाच स्वत:ची नवीन ओळख झाली.
तसा हा नाद माला सधारण तीन-साडेतीन वर्षांपुर्वीच लागला होता... पण सुरवातीचा काळ incubation period होता बहुतेक. राहुल (room mate) ने जेव्हा ’कॅमेरा’ वाला मोबाईल् घेतला खरं तर तेव्हाच नकळत ह्या नादाची सुरवात झाली. श्रीकांत, विजय नेहमी मी फोटो काढल्यावर ’वा वा’ करायचे.. सुरवातीला वाटाले की झाडावर चढवतातेय पण नंतर माझाही हळुहळु interest वाढायला लागला आणि मग अजुन जोमानं फोटो काढायला लागलो. इकडे ’ऑफीस’ला पण दिपा चा कॅमेरा होताच. कसं, काय माहीत पण तिलाही वाटायचे कि हा चांगले फोटो काढतो म्हणुन... कधी बाहेर गेलो की ती बिनधास्त कॅमेरा माझ्याकडेच देउन मोकळी व्हायची. मग मी पण मिळालेली आयती संधी सोडायचो नाही, सगळ्यात पहीला हाताळलेला डीजिकॅम म्हणजे दिपाचाच्.. नंतर मग श्रीकांतने पण कॅमेरा घेतला, मग काय, ’रूम’ वर डेली ’फोटोसेशन्स्’ सुरु झाले. सकळी अंथरुणातुन उठल्यापासुन ते रात्री पुन्हा अंथरुणात शिरेपर्यंत.. एकच खेळ चाललेला असायचा- फ़ोटो फ़ोटो, अर्थात ऑफीस टाईम सांभाळुन.

हळुहळु मग मला सुद्धा कॅमेरा घ्यावसा वाटायला लागला आणि लवकरच ’ऑन साईट’ जायची संधी आली. US ला जाण्याच्या थ्रील पेक्षा नवीन कॅमेरा येणार ह्याची excitement जास्त होती. US ला गेल्यावर लवकरच कॅमेरा घेतला.. आणि खरी गंमत सुरु झाली. आत्तापर्यंत फ़क्त डीजिकॅम वापरलेला मी, S3 चे छान फ़ीचर्स् बघुन वेडा झालो. US चे बहुतेक दिवस कॅमेरा explore करण्यातच गेले. US हुन परतल्यानंतर नंतर १-२ महीन्यांतच सगळे room mates विखुरले गेले. राहुल ची विकेट पडली होती(लग्न), श्रीकांतने M.S. साठी US ला भरारी मारली आणि विजयरावांनी तर दिल्लीवर ’कुच’ केले होते. मी बऱ्यापैकी एकटा पडलो होतो. फोटो-फोटो खेळ्णारं आता कुणी नव्हतं. नवीन लोकांबरोबर राहायची इच्छा नव्हती म्हणुन एकटाच राहु लागलो. ऑफ़ीस मध्ये कसा वेळ जायचा कळायचं नाही पण घरी आल्यावर मात्र रुम खायला उठायची. त्याच वेळेस कॅमेऱ्याचं ’युजर मॅन्युअल’ पुर्ण वाचुन काढलं, त्यात ’मॅन्युअल मोड’ ला ’फ़ुल क्रिएटिव्ह् झोन’ म्हणलं होतं, त्यामुळे तो जाणुन घ्यायची उत्सुकता वाढली. ’गूगल्’ च्या मदतीने शटरस्पीड, ’अपार्चर’ चे फ़ंडे कळाले, हळुहळु exposure, ISO settings चे महत्व कळाले. एकटाच फोटो-फोटो खेळायला लागलो, कधी संभाजी बागेत, कधी मुठे काठी तर कधी वर्तक उद्यान येथे छोटे-छोटे ’सेशन्स’ व्हायला लागले. थोड्याच दिवसात मग कॅमेऱ्यावर बऱ्यापैकी ’होल्ड’ आला. त्या नंतर आजवर काही तुरळक अपवाद वगळता कॅमेऱ्याने ’M’ ’मोड’ सोडलाच नाही. मी तर मोकाटच सुटलो होतो, माझ्यातला भैसटलेला कलाकार जागा झाला, एक वेग्ळीच धुंद चढ्ली होती. दिसेल त्याचे फ़ोटो कढत सुटलो, उचलंला कॅमेरा आणि लावला डोळ्याला... असंच झालं होतं, काळ-वेळ कसलंही भान नसायचं, भुक वाढतच होती, दिसेल ते कॅमेराबद्ध करायची घाण सवय लागली होती. मग हळु हळु कळत गेलं की जरा अति होतय. एव्हाना hard disk चे पण ’जागे’ वरुन रुसवे फुगवे वाढले होते. १००-२०० फ़ोटोंमधुन फ़क्त एखाद-दुसराच फ़ोटो मनासारखा येत होता, बाकिचे उगाच ’जागा’ खातायेत हे जाणवलं. हळु हळु कॅमेऱ्याचे ’लिमीटेशन्स’ पण कळाले. आपला कॅमेरा कमी उजेडात ’माती खातो’ हे कळ्ल्यावर वाइट वाटले. मग ठरवलं की चाललेली ’भैसटगीरी’ जरा कमी करायची. दिसेल त्याचे फ़ोटो नाही काढायचे, डीजिटल आहे म्हणुन जास्त माज नाही करायचा.. व्यवस्थित, 'कंम्पोजीशन' सांभाळुन, 'लाईट' बघुन मगच कॅमेरा डोळ्याला लावायचा, भले कितीही चांगला ’मोमेंट’ असो. सुरवातीला थोडा त्रास झाला, पण हळु हळु फायदे दिसायला लागले. संयम वाढला, सुरवातिला एका ’फोटोशुट’ (outing) नंतर येणाऱ्या १००-२०० फ़ोटोंचा आकडा आता २५-५० वर येवु लागला. ठरवुन काढलेल्या आणि मनासारखे ’रिझल्ट्स’ मिळालेल्या फ़ोटोंचे मोल काही वेगळेच असते हे उमजले. जसा खुप मोठा प्रोग्राम लिहुन झाल्यावर पहील्यांदा जर compile करताना एकही warning किंवा error नाही आली तर कसा आनंद होतो, अगदी तसाच आनंद व्ह्यायला लागला. स्व्:तला स्वत्:चाच अभिमान वाटायला लागला. मग काय, मी खुष, कॅमेरा खुष आणी Hard Disk पण सुखाने ’नांदु लागली’. त्याच दिवसांत फ़्लिकर बाबत कळलं, त्यावरचा p@p ग्रुप कळला, तिथल्या डॉन लोकांकडुन भरपुर टिप्स, ट्रिक्स् कळाल्या आणि post processing किती मह्त्वाचे आहे ते कळलं. तसं मी पण Picassa वापरत होतोच, पण अता photoshop ची गरज भासु लागली. मग नेहमी प्रमाणे ज्योती मदतीला धावली, तिच्याकडुन फ़ोटोशॉप चे ’बेसिक’ धडे घेतले. एखाद्या ’प्रोफ़ेशनल’ Texturing artist पेक्षा चांगलं फ़ोटोशॉप मला कोण शिकवु शकणार होतं? color channels, levels, curves, selective color, strokes सारख्या सोप्या गोष्टी शिकायला जास्तं वेळ नाही लागला, पण layers, masks चे फंडे कळायला थोडा वेळ लागला. सुरवातीला वाटायचं की post processing करणं चुकीचं आहे, कितीही वाईट फोटो त्यात मस्त एडिट करता येतो, मग फोटोग्राफरचं स्कील ते काय राहीलं? पण ते तसं नव्हतं, नसतं. बऱ्याच वेळेस कॅमेरा सगळी फ़्रेम व्यवस्थित आपल्या डोळ्याना दिसते तशी रेकॉर्ड करत नाही... खासकरुन landscapes चे फोटो. त्यात जर आकाशाकडं लक्ष द्यायचं म्हणलं तर बाकीची फ़्रेम अंधारात जाते (underexpose) तसच बाकीच्या ठिकाणी लक्ष द्यावं म्हणलं तर आकाशाचं गणित चुकतं. मग त्यासाठी processing ही करावीच लागते. फ़िल्म कॅमेऱ्या (रोल वाला) साठी जशी ’डार्करूम’ महत्वाची असते ना, अगदी तशीच image processing softwares डिजीटल कॅमेऱ्या साठी महत्वाची असतात. हां पण मी शक्यतो जेवढा चांगला फ़ोटो कॅमेऱ्यातुन घेणं शक्य आहे तेवढा कॅमेऱ्यातुनच घेतो आणी बाकिचं काम जे कॅमेरा करु शकत नाही, ते फोटोशॉप मध्ये करतो. असो. सांगायचं एवढंच होतं की आता फोटोग्राफी बरोबर, फोटोशॉप ही शिकावं लागत होतं. रोज संध्याकाळी घरी आल्यावर फोटोशॉपचे धडे गिरवायला लागलो. गरज पडली तर YouTube वरचे व्हिडीओज् (photoshop tutorials) बघु लागलो, अजुनही बघतो. त्याचापण बराच फ़ायदा झाला, नवनवीन tricks कळल्या. एवढं करुन पण अजुनही पुर्णपणे फोटोशॉप येत नाही.. अजूनही शीकतोच आहे. आता वाटतं एवढा वेळ जर कधी ऑफीसच्या कामासाठी घालवला असता तर आत्तापर्यंत एखाद दुसरं ’पेटंट’ नक्कीच खिशात घातलं असतं. Anyway, त्याचा scope अजुनही आहे, राहील.

असं हळु हळु आयुष्य कुस बदलत होतं, पुर्वी फ़क्त व्यंगचित्रांचे प्रदर्शनं बघणारा मी किंवा कधीतरी बालगंधर्वच्या कलादालनाला भेट देणारा मी, चक्क पुण्यातल्या कानाकोपऱ्यातल्या फ़ोटोग्राफ़ी एक्झीबीशन्स् ला भेट द्यायला लागलो, त्यानिमीत्ताने नवनवीन आर्ट गॅलेरीज कळाल्या, फोटोग्राफ़रशी चर्चा, मार्गदर्शन व टिप्स् घेवु लागलो. तसंच, पुर्वी फ़क्त 'टकाटक फ़ोटों’साठी पुणे टाईम्स् बघायचो, आता रोज ’Today's Events’ वर नजर ठेवतो. ’मॉल्स’, ’म्ल्टीप्लेक्स’ ला जाण कमी झालं. असंच एक ’एक्झीबीशन’ बघायला मी F.C Road वर Aperture India (आर्ट’गॅलेरि’) त गेलो होतो, तिकडे जय ला भेटलो, जो एक प्रोफेशनल् फाईन आर्ट फ़ोटोग्राफ़र आहे. त्याचं work तर भन्नाट होतं, तेव्हाच कळलं कि त्याने एक् ८ दिवसांचे workshop ऍरेंज् केलय Beginners साठी. एक क्षणही न दडवता मी नाव नोंदवले. अभिराजला पण पटवलं. ’वर्कशॉप’ मस्त झाला, जय कडुन भरपुर ’टिप्स्’ मिळाल्या. Technical knowledge तर पहीलेच बऱ्यापैकी माहीत होतं, पण जय कडुन ’कंम्पोजीशन्स्’ च्या छान ’टिप्स्’ मिळाल्या. शेवटच्या दिवशी full day outing होती, पहाटे लवकर निघुन पुण्याबाहेर सुर्योदय गठायचा, त्याचे फ़ोटो काढायचे आणि तसेच रस्त्यात वाटेल तिथे थांबत, फ़ोटो काढत काढत महाबळेश्वर् गाठायचं, आणि परत तसंच येता येता एका मस्त ठिकाणी सुर्योस्त गाठुन परतीचा रस्ता पकडायचा. त्याच outing च्या वेळेस घड्लेला एक किस्सा इथं नमुद करावासा वाटतो. महाबळेश्वरहुन येताना पंचगणि च्या tabletop वर् पोचलो होतो. लांब एक उंट उभा होता, जो नेहमीच तेथे असतो. जय ने सांगितलं "चलो, camel का फोटो निकालते है", माझ्याकडे 12-X झुम वाला कॅमेरा असल्यामुळे मी असल्याठीकाणाहुनच ’झुम’ मारुन एक ’फ़्रेम मारली’ आणि जय ला दाखवली. त्यावर त्याची रीअऍक्शन्- "ये क्या निकाला, frame के center मे camel को बिठा दिया, और हो गया फोटो? ये तो कोई बच्चा भी कर लेगा, आप ने क्या अलग किया? go, get closer, observe the light, think of some creative frame and then click" अशी होती. मी पेटलोच, उंटाच्या समोर गेलो, थोडा विचार केला, ऊंटाची लांबलचक मानेकडे लक्ष गेलं आणी Perspective ची आयडिया सुचली. ’मोड’ 'Tv' (shutter priority) वर सेट केला, पण उंट जरा जास्तच उंच होता (कदाचित ’उंच’ ह्या शब्दावरुनच त्याला ’उंट’ हे नाव पडले असावे) म्हणुन मग दोन्ही हातात कॅमेरा धरुन, हात शक्य तेवढे वर ताणुन व्यवस्थित अंदाज घेवुन उड्या मरुन फ़ोटो काढु लागलो, उंटा ला पण बहुतेक विचीत्रं वाटलं असणारं, अश्या प्रकारचं माकड त्याने कधी पाहिलं नसावं, त्याला पण गंमत वाटली असावी. त्याने एकदम कॅमेऱ्य़ाजवळ मान खाली केली, आणि मी लगेच ’क्लिकलो’. हा फ़ोटो मिळाला.




नंतर जेव्हा तो फ़ोटो जय ला दाखवला तेव्हा वाटलं, सरदार खुष होगा, साबासी देगा.. पण त्याची प्रतिक्रिया खुपच ’नॉरमल’ होती, "ठिक हे, थोडा underexposed हे, line of horizon is also li’l inclined, cud have been better.. gud attempt though". त्याने व्यवस्थित चुका काढ्ल्या होत्या, पण मला माझा ’धडा’ मिळाला होता - काहीतरी वेगळं विचार करण्याचा.. "think of some creative frame and then click".. त्याचे ते शब्द आणि तो प्रसंग कायमचेच लक्षात राहीले.

अशा प्रकारे Workshop चा पण चांगलाच फायदा झाला होता, 'कंपोजीशन' मध्ये बऱ्या पैकि सुधारणा झाली. इतरांनाही फोटो आवडु लागले होते, त्याला घरचे अपवाद कसे असणार? एव्हाना तर घरच्यांनाही माझ्या नादाची चांगलीच सवय झाली होती, आधी दुर्लक्ष केले त्यांनी, वाटले नेहमी सारखं ’नऊ दिवसांचं’ खुळ आहे म्हणुन..
त्यानंतर मग ’सकाळ’च्या ’रिफ्लेक्शन ०८’ प्रदर्शनात झळकलेला माझा एक फोटो असो कींवा ऑफीस मधल्या "Best Smile Kauntest" जिंकलेला शिल्पा चा फोटो असो त्यांचा माझ्या नादा कडे बघण्याचा द्रुष्टिकोण बदलत गेला. सुरवातिला "आता फेक् तो कॅमेरा बाजुला" म्हणणारे माझे आई-वडील मला प्रोत्साहन द्यायला लागले होते. "प्रितम, आपल्या बागेत ’exhora’ छान फुलंलाय बघ", "२-३ दिवसांत गुलाबाच्या कळ्या पण उमलतील", किंवा "अरे काल बागेत मुंगुस दिसलं, कदाचित साप पण असेन.. ये फोटो काढायला" अशा नाना गोष्टी सांगु लागले, जेणेकरुन माला चांगले फोटोज् मिळतील. केरळ ला जाताना सकाळी सकाळी Railaway Station वर माकडं पाणी पितानाचा फोटो पण त्यांच्या तिक्ष्ण नजरे मुळेच मिळला, मी तर मस्त वरच्या ’बर्थ्’ वर पडी मारली होती. एकंदरीत त्यांनाही पटायला लागलं की पोरगं चांगलंच नादाला लागलंया.
आता वाटतं, आपल्या नादाला एवढा मस्त सपोर्ट करणारे आई-वडील आणि बहीण मिळणे याहुन वेगळं काय ते हवं आयुष्याकडुन? "पाहीजे ना, तशीच ’सपोर्टिव्ह’ बायको", लगेच 'आतुन' आवाज येतो.

तसा घरच्यांप्रमाणेच मालाही स्वतः मध्ये चांगलाच बदल जाणवत होता. नाद तर बहरत होताच, पण त्याबरोबर माझं खुपच general असलेलं general knowledge ही वाढत होत, बारावी नंतर मागे पडलेलं अवांतर वाचन (’स्पेशली’ मराठी) वाढलं. चांगला हटके फोटो मिळावा म्हणुन छोट्या छोट्या गोष्टीं मधले बारकावे बघण्याची आपसुकच सवय लागली. मांजरी कुत्र्यांबद्दल तर लहानपणा पासुनंच आकर्षण होतं, पण आता गाढंव किंवा डुक्कराचं पिल्लुपण ’फोटोजेनीक’ वाटु लागलं. पुर्वी कावळा, चिमणी, कबुतर फार फार तर खार-घुबड इथपर्यंत असलेलं माझं ’पक्षीप्रेम’ आता आपण कुठल्या पक्ष्याचा फोटो काढलाय या शोधार्थ Pied bushchat, Barbler, Heron, Sunbird etc, पर्यंत वाढलं. ऎरवी Weekend ला सकाळी ९-९ वाजेपर्यंत लोळत पडलेला मी, आता पहाटेच उठुन पक्षीनीरीक्षणासाठी पाषाण लेक, कवडी पाट सारख्या ठिकाणी जावु लागलो, एका चांगल्या फोटो साठी तासन् तास वाट बघु लागलो. तसं फिरणं, भटकणं ह्याची आवड तर वडलांनी लहानपणापासुनचं लावली होती, पण त्यांच्या संख्येत आता लक्षणीय वाढ झाली. आजही एखादा weekend जर कुठे गेलो नाही किंवा कॅमेऱ्याला हात नाही लावला की weekend वाया गेल्या सारखे वाटते, पुढचे पाचंही दिवस रुखरुख लागते.

ह्या सर्व बदलांमुळे ’फ़्रेंड सर्कल’ ही भरपुर वाढला, फोटोप्रेमी तर भेटलेच पण काही पक्षीप्रेमी, काही सर्पमित्रांशीही ओळखी झाल्या. विशेष म्हणजे काही जुन्या मित्रांची सारख्या छंदा मुळे नव्याने ओळ्ख झाली. अजिंक्य(उर्फ् जंक्या) हा त्या पैकीच एक. तसे आम्ही F.E. पासुन एकमेकांना ओळखतो, कॉलेज ला असताना पण भरपुर एकत्र राहीलो, हींडलो पण आता मला वेगळाच जंक्या भेटला, तो आता पुर्वी सारखा फक्तं १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारीला फ़िरत नाही, त्याने तर दर weekend ला पुण्यात थांबायचे नाही अशी शप्पथच घेतलिये जणु. कुणी बरोबर नसेल तर पठ्ठ्या एकटंच फ़िरतो. ताम्हीणी, पानशेत, वेळास, भीमाशंकर, पाबे घाट, भोर, वरंधा घाट म्हणजे त्याची 'second homes', सगळे कानेकोपरे तोंड पाठ. भिमाशंकरचा Forest Officer तर त्याला चांगलंच ओळखतो. तुम्ही एवढ्यात जर भिमाशंकर ला गेला असाल तर तिकडं रस्त्यावर शेकरुचा(Giant Squirrel) एक मोठा फोटो लावलाय, तो ह्यानेच काढलाय. पण त्याचा नाद माझ्या नादापेक्षा जरा वेगळा आहे. तो फोटो तर उत्तम काढ्तोच पण त्याचं पहीलं प्रेम ’फोटोग्राफी’ नसुन भटकंती आहे, फोटोग्राफी हा त्याचा ’साईड-नाद’. माझं एकदम उलटं, माझं पहीलं प्रेम ’फोटोग्राफी’, मग भटकंती. तरी आमचं मेतकुट छान जमलंय, तो मला वेगवेगळ्या जागा दाखवत असतो आणी मी त्याला माझं ’फोटोग्राफीचं’ ग्यान पाजळत असतो. गेल्या वर्षभरात भरपूर फिरलोय त्याच्या बरोबर.


दोघांनाही प्रेयसी (girl friend हो) नसल्याचे फायदे, अजुन काय!! आता दोघांनाही upgrade करायचंय... साहेबांना Gypsy चे वेध लागलेत तर आम्हाला DSLR चे. कारण आता दोन अडीच वर्षांत बऱ्यापैकी कळायला लागलय, सध्याच्या कॅमेऱ्याचे सगळे limitations कळलेत. आता पुढची पायरी गाठायचीय, डोक्यात बरेच प्लॅन्स आहेत पण त्यासाठी आता DSLR गरज वाटु लागलीय. बघुयात कधी योग येतो ते, ’सेव्हींग्ज’ तर चालुच आहे, जमले पैसे कि लवकरंच ’बार’ उडवावा म्हणतो.

हा ’ब्लॉग’ पण त्या पुढच्या पायरीचाच एक भाग आहे. खर तर कधीपासुन डोक्यात होतं, पण मुहुर्त लागता लागत नव्हता. गणेश चतुर्थीला launch करु म्हणता म्हणता शेवटी दसरा उजाडला तरी काही ना काही अडचणी येतंच आहे. खरंतर ’फोटोग्राफी’ साठी बाहेर भटकताना बऱ्य़ाच गंमती होतात, काही मजेशीर किस्से घडतात. कधी मामा लोकंच (कॉन्स्टेबल् काका) त्रास देतात तर कधी मजेशीर माणसं भेटतात. कधी कधी धांदरट स्वभावामुळे आमची पण मस्त वाट लागते. ह्या सगळ्या गोष्टी नक्कीच सांगण्यासारख्या असतात. आपण बघणाऱ्या कुठ्ल्याही फोटोमागे काही तरी सांगण्यासारखे नक्कीच असते. प्रत्येक वेळी मजेशीर किस्सेच असतील असं नाही, कधी त्या मागची कल्पना, विचार वगैरे. नाही काही तर प्रवास वर्णनं तर नक्कीच सांगण्यासारखे असते. हे सर्व share करायला मला नक्कीच आवडेल, आणि त्यासाठी ’हा’ एक उत्तम मार्ग वाटला.. तसेच ह्या निमित्ताने इतरांनाही काही फायदा झालाच, तर त्याहुन वेगळं समाधान ते कसलं? म्हणुनच हा एवढा खटाटोप्. तसं लिखाण माझ्यासठी काही नवं नाही, कधी कवीता, कधी प्रेमपत्र.. असे भरपुर प्रयत्न मारुन झालेत:) प्रवास वर्णन लिहीणं तसं नवीन् आहे, पण आपण मनापासुन ठरवले व प्रयत्न केले तर ह्या जगात काहीही अशक्य नाही...अपयश फ़क्त प्रयत्न कमी पडल्यामुळे येतात. कॉर्पोरेट मधलं ’ओ सिकंदर्’ गाणं नीट ऐका, त्यात पण हेच् सांगितलय- "तुझमे भी वो बात हे, तेरी भी ओकात हे, तु भी बन सकता है... सिकंदर". असो. हळु हळु लिखाण पण जमेल- प्रयत्नांती परमेश्वर.

आणि हो, मला हे चांगलेच माहीतिये की माझे फ़ोटो काही एकदम भारी नाहीयेत, अजुन् भरपुर पल्ला गाठायचाय, शिकायचंय. ही तर खरी सुरवात् पण नाहीये, खऱ्या प्रवासाला तेव्हाच सुरवात होईल जेव्हा माझ्या कडे चांगला कॅमेरा येईन..

बाकी ह्या ब्लॉग मागे पण भरपुर मेहनत घेतलीय गेले दीड-दोन महीने. पार domain registration पासुन ते ह्या अर्टीकल पर्यंत, प्र्त्येक टप्प्यात नाना अडचणी आल्यात. सुरवातीला तर template सिलेक्ट करण्यातंच १५ दीवस गेले, ५०-६० template नंतर हे सध्याचं आहे ते आवडलं, ह्यात पण बरेच बदल केले, नको असलेल्या गोष्टी काढुन टाकल्या, त्यसाठी java script समजुन घ्याव लागलं, तसं जास्तं अवघंड नव्हतं पण जायचा तो वेळ गेलाच, नंतर ’हेडर’ साठी ’बॅनर’ बनवलं, त्यात मात्र भरपुर वेळ गेला, color combination पासुन ते ’फोटो कोलाज’ पर्यन्त सगळ्याच गोष्टींना वेळ लागला, नेहमी प्रमाणे ज्योती ची मदत झालिचं, ते सांगणे न लगे. Tagline मात्र आपसुकच सुचली - My motto... better photo ह्यावर जास्त वेळ विचार नाही करावा लागला. ’बराहा पॅड’ वर लिहता लिहता नाकी नऊ आलेत, यापेक्षा काही चांगला ऑप्शन असेल तर् नक्की सुचवा.
शेवटी, हा लेख आणी एकंदरीत ब्लॉग चा apprearance कसा वाटला, हे कळवायला विसरु नका, मी वाट बघतोय.. आणि लवकरच पुढची पोस्ट (भरपुर फ़ोटोसहीत) घेवुन येतोय- "आता मी पण सर्पमित्र".

ये रे मझ्या मागल्या

 

प्रितमभावसार.कॉम. Copyright 2009 All Rights Reserved